जेएनएन, पुणे. Sant Dnyaneshwar Mauli Palkhi Ashadhi Wari 2026: श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज  8 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता आषाढीवारी साठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात हा प्रस्थान सोहळा होणार आहे.

1660 व्यक्तींच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार

संस्थान कमिटीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढीवारी पालखी सोहळा 2026 चा पालखी प्रस्थान कार्यक्रम दिनांक 8 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात होणारा सोहळा मर्यादित लोकांमध्ये संपन्न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये श्रींच्या रथापुढील दिंडी क 1 ते 27 व रथामागील दिंडी क्र. 1 ते 20 (पोटभाग घरून एकुण 56) मधील प्रत्येकी 10 वारकरी असे एकुण 560 वारकरी आणि परंपरेनुसार दिंडीप्रमुख, मानकरी सेवेकरी, प्रतिष्ठित यांना नारळप्रसादासाठी एकुण 500 व्यक्तींना प्रवेश दिला जाईल. तसेच मानाचे खांदेकरी, कर्मचारी, आरोग्य, स्वच्छता सेवक, पोलीस असे एकुण 1660 व्यक्तींमध्ये पालखी प्रस्थान सोहळा पार पाडण्यात येईल, अशी माहिती संस्थान कमिटीने निवेदनात दिली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी कार्यक्रम

संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी ही 8 जुलै रोजी पंढरपूरला प्रस्थान करणार आहे आणि दि. 24 जुलै रोजी पंढरपूरला पालखी सोहळा पोहचणार आहे. या वर्षी प्रस्थानाची वेळ दुपारी तीनची आहे. या सोहळ्यादरम्यान 17 दिवस मुक्काम, 4 गोल तर 3 उभे रिंगण होणार आहेच. तर आषाढी एकादशी 25 जुलै रोजी साजरी होणार (ashadhi ekadashi 2026 date) आहे. 

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे सविस्तर वेळापत्रक (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony 2026 Detailed schedule)

    • ज्येष्ठ वद्य अष्टमी अर्थात बुधवारी (दि. 8 जुलै) आळंदी येथून प्रस्थान,
    • 9 व 10 जुलै पुण्यात मुक्काम, 
    • 11 व 12 जुलै सासवड मुक्कामी, 
    • दि. 13 जुलै रोजी जेजुरी, 
    • दि. 14 जुलै रोजी वाल्हे मुक्कामी राहणार आहे.
    • दि. 15 जुलै रोजी नीरा स्नान करून पालखी लोणंद येथे मुक्कमी 
    • दि. 16 जुलै रोजी लोणंद येथून पुढे दुपारी पालखी चांदोबाचा लिंब येथे सोहळ्यातील पहिले उभे रिंगण होऊन पालखी तरडगाव येथे मुक्कामी येणार आहे. 
    • दि. 17 जुलै रोजी फलटण, 
    • तर 18 जुलै रोजी बरड येथे पालखी मुक्कमी असणार आहे.
    • 19 जुलै रोजी नातेपुते येथे पालखी मुक्कामी राहणार आहे. 
    • दि 20 जुलै रोजी पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होऊन पालखी माळशिरस येथे मुक्कामी असेल. 
    • दि. 21 जुलै रोजी खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होऊन वेळापूर येथे पालखी विसावणार आहे.
    • दि. 22 जुलै रोजी ठाकुरबूवा समाधीजवळ तिसरे गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट होऊन पालखी भंडीशेगाव मुक्कामी आहे. 
    • दि. 23 जुलै रोजी बाजीराव विहीर येथे गोल आणि उभे रिंगण होऊन पालखी वाखरी येथे विसावणार आहे. दि. 24 रोजी म्हणजेच आषाढ दशमीला दुपारी उभे रिंगण होऊन सर्व संतांच्या पालखी पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहेत. 
    • दि. 25 जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा होणार आहे. 

    हेही वाचा - Sant Dnyaneshwar Mauli Palkhi 2026 Schedule: संत ज्ञानेश्वर माउली पालखीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, वाचा कुठे रिंगण सोहळा अन् मुक्काम