जेएनएन, कोल्हापूर. Chhava film: छावा चित्रपटात संभाजीराजे हे लेझिमवर नृत्य करताना दिसले आहेत. लेझिम खेळताना दाखविणे चुकीचे नाही, पण ते लेझिमवर नृत्य करताना दाखविले आहे. सिनेमॅटिक लिबर्टी किती घ्यावी याला देखील काही मर्यादा आहे. संभाजी राजे यांच्या जीवनावर छावा चित्रपट होतोय, ही आनंदाची बाब, मात्र, छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांना विनंती आहे महाराष्ट्रातील इतिहासकारांकडून माहिती घ्यावी, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. (Sambhaji raje Chhatrapati on Chhava film)

इतिहास संशोधकांना  चित्रपट दाखवावा

चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी माझी भेट घेतली होती, त्यावेळेला सर्व चित्रपट झाल्यानंतर तो चित्रपट इतिहास अभ्यासकांसोबत दाखवा अशी विनंती केली होती. आता देखील त्यांना विनंती आहे, त्यांनी आम्हाला आणि इतिहास संशोधकांना तो चित्रपट दाखवावा, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

त्यांनी खूप मोठं धाडस करून

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक उत्तेकर एक मराठी माणूस आहेत. त्यांनी खूप मोठं धाडस करून संभाजी महाराजांवर चित्रपट बनवला आहे. त्यामुळे यामध्ये कुठलेही चुका राहू नयेत अशीच आमची ही इच्छा आहे. त्यामुळे इतिहास संशोधकांना तो चित्रपट दाखवावा असं  संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

    सरकारवर थोडा तरी विश्वास दाखवला 

    वाल्मिक कराड प्रकरणात पोलिसांवर आणि सरकारवर थोडा तरी विश्वास दाखवला पाहिजे, असं माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले.