पुणे- Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol : कसबा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. धंगेकरांनी जैन होस्टेल खरेदी प्रकरणात मोहोळ यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. त्या प्रकरणाचा गदारोळ अजून शांत होण्याआधीच त्यांनी आता नवीन गौप्यस्फोट केला आहे.
बिल्डरची गाडी वापरल्याचा आरोप!
धंगेकरांनी ट्विट करून असा दावा केला आहे की, मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे महापौर असताना बिल्डर बडेकर यांची गाडी वापरत होते. हे केवळ नैतिकतेच्या पलीकडेच नाही, तर हितसंबंधांच्या संघर्षाचं उदाहरण असल्याचं धंगेकरांचं म्हणणं आहे.
पुणे शहराचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जैन होस्टेल खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचे अनेक पुरावे पुणेकरांनी गेल्या काही दिवसात पाहिले आहेत. परंतु तरी देखील ते या सर्व गोष्टी योगायोग असलेले सांगतात.
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) October 23, 2025
मी आपणास काही माहिती देऊ इच्छितो,मोहोळ हे खासदार होण्याच्या… pic.twitter.com/01zmvCUrnj
जैन बोर्डिंगच्या जमिनीशी संबंध?
याच बिल्डर बडेकर यांनी जैन बोर्डिंगची जमीन खरेदीसाठी दुसऱ्या क्रमांकाची बोली लावली होती, असं धंगेकरांनी नमूद केलं आहे. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण अधिक संशयास्पद बनले आहे. बडेकर आणि मोहोळ यांचे आपसातील आर्थिक व्यवहार आणि संबंध याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
कोथरुडमधील प्रोजेक्ट्सवरही आरोप!
धंगेकरांनी पुढे सांगितले की, “कोथरुड भागात पुनर्विकासाचे अनेक प्रोजेक्ट बडेकर बिल्डरकडे आहेत. या सर्व प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांचा अप्रत्यक्ष फायदा झाला आहे याची चौकशी झाली पाहिजे. या संदर्भात अधिकृत तपासाची मागणी धंगेकर यांनी केली आहे.
दमदाटी करून पार्टनरशिप मिळवली?
मुरलीधर मोहोळ यांनी बडेकर बिल्डिंग कंपनीत दमदाटी करून पार्टनरशिप मिळवली असा दावा धंगेकरांनी केले आहे .हे आरोप खरे ठरल्यास भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर या दोन्ही मुद्द्यांवर मोठं वादळ निर्माण होऊ शकते.
