जेएनएन, मुंबई: महाराष्ट्राला लवकरच 13 वी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. भारतीय रेल्वेकडून या नवीन सेवेची तयारी सुरू झाली आहे. ही सेवा दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडणार आहे. या गाडीमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान, आरामदायी आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त होणार आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, नवीन वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी नांदेड ते पुणे (pune to nanded vande bharat) महाराष्ट्रातील दोन औद्योगिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्यांना थेट जोडेल जाणार आहे. या मार्गावर एकूण सहा स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. प्रत्येक स्थानकावर केवळ काही मिनिटांचा थांबा ठेवून ही गाडी उच्च वेगाने धावणार आहे. 

या वंदे भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्ये

  • पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानावर आधारित सेमी-हायस्पीड ट्रेन 
  • 16 कोचचा रचना प्रकार, एसी चेअरसह आरामदायी आसन व्यवस्था
  • जीपीएस आधारित ऑडिओ-व्हिज्युअल प्रवासी माहिती प्रणाली
  • स्वयंचलित दरवाजे आणि बायो-व्हॅक्युम टॉयलेट्स
  • Wi-Fi आणि चार्जिंग पोर्ट सुविधा
  • 160 किमी प्रतितास वेगाने धावण्याची क्षमता

संभाव्य स्थानके (प्राथमिक यादी):

  1. प्रस्थान स्थानक – नांदेड/ पुणे (संभाव्य प्रारंभबिंदू)
  2. नांदेड
  3. लातूर
  4. धाराशिव
  5. कुर्डुवाडी
  6. दौंड आणि पुणे

रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही ट्रेन प्रामुख्याने नांदेड आणि पुणे शहराला जोडण्याचा काम करणार आहे. यामुळे व्यापार, पर्यटन आणि औद्योगिक प्रवासाला मोठी चालना मिळेल.

रेल्वे मंत्रालयाने या गाडीच्या चाचण्या पूर्ण केले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात आठवड्यातून सहा दिवस या गाडीचे नियोजन केले जाईल. लवकरच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या गाडीचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.

    महाराष्ट्रात 12 वंदे भारत एक्सप्रेस

    महाराष्ट्रात सध्या 12 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या विविध मार्गांवर धावत आहेत – त्यामध्ये मुंबई-गोवा, मुंबई-शिर्डी, नागपूर-बिलासपूर, सोलापूर-मुंबई, पुणे-अहमदाबाद यांचा समावेश आहे. आता ही 13 वी गाडी सुरू झाल्यानंतर राज्यातील रेल्वे संपर्क आणखी मजबूत होणार आहे.