जेएनएन, पुणे. Pune Rains: पुणे जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. पुढील 3 तासांत जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असे जिल्हा प्रशासनाचे आवाहन केले आहे.

मुठा नदीत 15,442 विसर्ग होणार

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरु असलेल्या 11 हजार 878 विसर्गात दुपारी 2 वाजता 15 हजार 442 इतकी वाढ करण्यात येणार आहे. प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे, अशी माहिती मुठा कालवे पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंत्यांनी दिली आहे. 

पुण्यात पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते

पुण्यातील घाट भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यावर सर्व अधिकाऱ्यांमार्फत लक्ष ठेवण्यात आली आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन केले आहे. नदी काठच्या लोकांना स्थलांतरित करण्याची वेळ येऊ शकते, मात्र, अद्याप अशी परिस्थिती नाही, असंही ते म्हणाले.

पानशेत धरणातूनही विसर्गात वाढ

    पानशेत धरणामधून नदी पात्रामध्ये सुरु असलेल्या विसर्गामध्ये वाढ करुन आज दुपारी 2 वा. 7 हजार 844 क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती उपविभागीय अभियंता मुठा कालवे पाटबंधारे यांनी दिली आहे.

    मुंबईतील मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ

    मुंबईत अजूनही पाऊस सुरूच असून आज पहाटे 4 ते सकाळी 11 पर्यंत सरासरी 150 मिमी पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. उपनगरात हे प्रमाण अधिक आहे. मिठी नदीची उंची 3.9 मीटर इतकी वाढली असून कुर्ला क्रांतीनगर येथून 350 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने आढावा घेत असून महापालिका आयुक्त परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.