एजन्सी, पुणे: शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका 48 वर्षीय आयटी इंजिनिअरचा (IT Engineer) एका कारने धडक दिल्याने मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.
कार 19 वर्षांचा एक तरुण चालवत असल्याचे समजते. ही घटना पाषाण-बावधन रस्त्यावर सकाळी 7.30 वाजता घडली, असे पोलिसांनी सांगितले. रेंद्र द्विवेदी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
कारने दिली धडक
"रस्ता ओलांडत असताना द्विवेदी यांना कारने धडक दिली. स्थानिक लोकांनी त्यांना जवळील रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला," असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
गुन्हा दाखल
चालक ईशान सेठिया (19) याच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात बीएनएस (BNS) कलम 106 (1) अंतर्गत 'बेफिकीरीने आणि निष्काळजीपणाने वाहन चालवून मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रकरणी' गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू होता.
