जेएनएन, जालना. मनोज जरांगे यांनी 15 सप्टेंबरला अंतरवालीतून मुंबईच्या दिशेने निघणार असल्याचं जाहीर केलं आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंकडून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाची घोषणा त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी सत्ताधारी आणि प्रशासनावर जोरदार टीका केली. अंतरवाली सराटीतील बैठकीत त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर, खोपोली रायगड या मार्गाने मुंबईत पोहोचणार आहे.

अंतरवाली सराटी ते मुंबई - मराठा आंदोलन मार्ग आणि मुक्काम

  • 15 सप्टेंबर - अंतरवाली सराटी, सकाळी 10, मुक्काम पाटोदा, 
  • 16 सप्टेंबर मुक्काम - श्रीगोंदा 
  • 17 सप्टेंबर - हडपसर 
  • 18 सप्टेंबर - खापोली रायगड
  • 19 सप्टेबर - आझाद मैदान 

जरांगेंना अश्रू अनावर

कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईत जायचंय जिंकून यायचंय आहे. समाजासाठी लढाई आहे..ॉ कुणाला खुन्नस द्यायची नाही. गाड्या घेऊन निघालो तरी 2- 3 दिवस लागतील इतक्या गाड्या आहेत, असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे. मराठा आंदोलकांच्या आत्महत्या विषयी बोलताना मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले, आरक्षणासाठी समाजातील मुल स्वतःला संपवत आहेत. त्यांच्या भविष्यासाठी आपल्याला मुंबईला जावे लागेल.

मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय

मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलन करणार आहेत. मराठा आंदोलकांनी होकार दिल्यानंतर मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असं मनोज जरांगे पाटील यांनी संगितलं.