जेएनएन, कोल्हापूर. Prashant Koratkar Attack Kolhapur: कोल्हापूर जिल्हा न्यायालयात कॅन्टीन परिसरात हल्ला केला. ॲड. अमित भोसले या हल्ला करणाऱ्या वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ‘पशा… छत्रपतींचा अपमान करतोस का?’ अशी घोषणाबाजी यावेळी भोसले यांनी केली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. 

पोलीस कोठडीत 30 मार्चपर्यंत वाढ 

प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्याला सकाळीच न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर कोर्टात आज दुपारी या प्रकरणावर सुनावणी झाली. प्रशांत कोरटकरच्या पोलीस कोठडीत कोर्टानं 30 मार्चपर्यंत वाढ केली आहे.

 ये पश्या... म्हणत

कोर्टातील सुनावणी झाल्यानंतर पोलिस कोरटकरला कोठडीत घेऊन जात होते. यावेळी न्यायालयाच्या परिसरात असलेल्या ॲड. अमित भोसले यांनी कोरटकरवर हल्ला चढवला. ये पश्या... म्हणत ते कोरटकरच्या दिशेने धावले असता पोलिसांनी तात्काळ त्यांना धरुन बाजुला केल्याचे व्हिडिओत दिसून येते.

    पोलीस कोठडी संपल्याने कोर्टात केलं हजर

    छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायाधीश एस.एस. तट यांच्यासमोर दोन्ही बाजुच्या वकिलांचा युक्तिवाद झाला. त्यानुसार, आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. 

    सरकारी पक्षातर्फे अॅड.सूर्यकांत पोवार तसेच, इंद्रजीत सावंत यांच्यातर्फे अॅड. असीम सरोदे हे ऑनलाइन पद्धतीने सुनावणीत सहभागी झाले होते. तर, प्रशांत कोरटकर याच्यातर्फे अॅड. सौरभ घाग प्रत्यक्ष उपस्थित होते.