जेएनएन, कोल्हापूर. Prashant Koratkar Attack Kolhapur: प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्याला सकाळीच न्यायालयात हजर करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोर्टाच्या गेटजवळ प्रत्येक नागरिकाची कसून तपासणी सुरू आहे.
तीन दिवसांपूर्वी जयदीप शेळके नावाच्या शिवप्रेमीने कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. आज पुन्हा जयदीप शेळकेने न्यायालयात घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच त्याला ताब्यात घेतले.
हेही वाचा - Maharashtra Former News: शेतकऱ्यांसाठी मोठी गुडन्यूज, 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2555 कोटी विमा नुकसान भरपाई
2 दिवसांची पोलीस कोठडी वाढ
दरम्यान, प्रशांत कोरटकरला आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात केलं हजर करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.
हेही वाचा - Pune Crime News: पत्नीची हत्या करुन मृतदेह भरला सुटकेसमध्ये, पतीला पोलिसांनी घेतलं ताब्यात
न्यायाधीश एस.एस. तट यांच्यासमोर दोन्ही बाजुच्या वकिलांचा युक्तिवाद झाला. त्यानुसार, आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड.सूर्यकांत पोवार तसेच, इंद्रजीत सावंत यांच्यातर्फे अॅड. असीम सरोदे हे ऑनलाइन पद्धतीने सुनावणीत सहभागी झाले होते. तर, प्रशांत कोरटकर याच्यातर्फे अॅड. सौरभ घाग प्रत्यक्ष उपस्थित होते.