जेएनएन,पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमधील संभाव्य युतीच्या चर्चेला उधाण आले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस — म्हणजेच अजित पवार गट आणि शरद पवार गट — एकत्र येणार का? असा प्रश्न पत्रकारांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला असता त्यांनी दिलेले उत्तर चर्चेचा विषय ठरत आहे.
अजित पवार यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना युतीची शक्यता फेटाळली नाही, उलट "सर्व बाजू तपासून पाहू," असं सांगून त्यांनी नव्या चर्चांना तोंड फोडलं आहे.
अजित पवार म्हणाले की, “युती संदर्भात मी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. आज पुण्यातले स्थानिक पदाधिकारी भेटले. दोन्ही शहराध्यक्ष, आमदार आणि माजी नगरसेवक भेटले. त्यांना मी सांगितले आहे की तुम्ही चाचणी करा. मी परत दोन दिवसांनी येतो आणि त्याबद्दल निर्णय घेऊ.” “अजून महानगरपालिकेचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. त्यामुळे काय घडते आणि कसे घडते हे बघावे लागेल. त्यानंतरच पुढील रणनीती ठरेल.” असे स्पष्ट विधान अजित पवार यांनी केले आहे.
हेही वाचा: निवडणुकीत शरद पवार पॅनलनं मारली बाजी; MCA निवडणुकीत भाजपला दे धक्का
