जेएनएन, मुंबई: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) निवडणुकीच्या निकालाने राज्याच्या राजकारणातही मोठी चर्चा रंगवली आहे. अनुभवी नेते शरद पवार यांच्या पॅनलने या निवडणुकीत भाजप समर्थित आशिष शेलार गटाला जोरदार पराभूत करत  विजय मिळवला आहे.

या निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यात थेट लढत होती. शेलार यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा होता, तर पवार पॅनलनं राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेत प्रभावी रणनीती आखली होती. त्याचा थेट परिणाम निकालांमध्ये दिसून आला.

MCA निवडणुकीचा निकाल:

उपाध्यक्षपद:- जितेंद्र आव्हाड (शरद पवार पॅनल)

सदस्यपद:- मिलिंद नार्वेकर (शरद पवार पॅनल)

सहसचिव:- निलेश भोसले (शरद पवार पॅनल)

    या तिन्ही पदांवर पवार पॅनलचे उमेदवार विजयी झाल्याने पवार गटाने या निवडणुकीत पूर्ण बाजी मारली आहे. निवडणुकीदरम्यान दोन्ही गटांमध्ये चुरशीची स्पर्धा होती, मात्र मतदानाच्या टप्प्यातच शरद पवार गटाचे संघटन आणि मैदानावरील पकड दिसून आली.

    शरद पवारांचे राजकीय पुनरागमन
    MCA निवडणुकीतला हा विजय केवळ क्रीडा संस्थेपुरता मर्यादित नसून तो राजकीय दृष्ट्याही महत्त्वाचा मानला जातो. अलीकडील घडामोडीनंतर शरद पवार यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या विजयाने त्यांच्या नेतृत्वाचे पुनरुज्जीवन झाल्याचे संकेत आहे.

    भाजपसाठी दे धक्का
    आशिष शेलार हे स्वतः अनुभवी राजकारणी आणि क्रिकेट प्रशासक असूनही ही निवडणूक गमावल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

    हेही वाचा: Local Body Election: भाजपाकडून उमेदवारांची यादी तयार, संध्याकाळी उशिरा AB फॉर्म मिळणार