जेएनएन, पुणे: शहराला आता प्रदूषणाच्या वाढत्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) ताज्या आकडेवारीनुसार, शहरातील हवेची गुणवत्ता गेल्या काही दिवसांत घसरून ‘मध्यम’ श्रेणीत आली आहे, ज्यामुळे पुणेकरांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली जात  आहे.

लोहगाव, वाकडमध्ये सर्वाधिक प्रदूषण
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील हवेची गुणवत्ता घसरण्यामागे हवामानातील बदल आणि प्रदूषण नियंत्रण घटकांतील अनियमितता ही प्रमुख कारणे आहेत. ‘मध्यम’ श्रेणीत (AQI 101 ते 200) हवेची गुणवत्ता आल्यास, संवेदनशील लोकांना दमा आणि श्वसनाचे आजार असलेले श्वसनाचे त्रास होण्याची शक्यता वाढली आहे.

शहरातील विशिष्ट भागांमध्ये तर प्रदूषणाची पातळी अधिक गंभीर झाली आहे. सर्वाधिक एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) लोहगाव (144) आणि वाकडमध्ये 145 या उच्चांकी पातळीवर नोंदविला आहे. याभागातील शहरात सर्वाधिक प्रदूषित हॉटस्पॉट ठरले आहेत.हिवाळ्यात प्रदूषणकारी घटक हवेत अडकत असल्याने  प्रदूषण वाढू शकते .

प्रदूषणच्या वाढत्या वैज्ञानिक कारण स्पष्ट करताना ‘परिसर’ संस्थेच्या श्वेता वेर्णेकर यांनी हिवाळ्यातील हवामान बदलाकडे लक्ष वेधले. "हिवाळ्यात थंड हवामान सुरू झाल्यावर, प्रदूषणकारी घटक हवेत वर जाण्याऐवजी जमिनीजवळच्या थरातच अडकतात. याला 'थर्मल इन्वर्जन' म्हणतात. यामुळे वाहनांचा धूर, बांधकामाची धूळ आणि इतर कण शहराच्या वातावरणात स्थिर होतात आणि हवेची गुणवत्ता खालावते.दरम्यान  महापालिकेकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.

पुण्यातील वाढत्या प्रदूषणाने नागरिक आणि पर्यावरण तज्ञांमध्ये मोठी चिंता निर्माण केली आहे. हवाची ‘वाईट’ किंवा ‘अति वाईट’ श्रेणीत जाण्यापूर्वी पुणे महानगरपालिकेने तातडीने कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.या उपाययोजनांमध्ये प्रामुख्याने बांधकाम स्थळांवर धूळ नियंत्रण, जु  आणि धूर सोडणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा: राष्ट्रवादीच्या आमदारामुळे अजित पवार अडचणीत, अल्पसंख्यक आमदार आणि समाज नाराज