जेएनएन, पुणे. Swargate Bus Rape Case: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात (Pune Crime News)एका 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणावर मंत्री योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे.

यामुळे दिली नाही माहिती

मंगळवारी सकाळी ही घटना घडली होती. त्यानंतर ही माहिती एक दिवस समोर आली नाही, यावर पत्रकारांनी गृहराज्यमंत्र्यांना प्रश्न केला होता. त्यावर उत्तर देतान कदम म्हणाले. आरोपी अलर्ट होईल यामुळे पोलिसांकडून दक्षता म्हणून ही माहिती देण्यात आली नाही. आता आम्हाला आरोपीचं स्थळ मिळालं आहे. ते मिळालं नसतं, असं स्पष्टीकरण कदम यांनी दिलं आहे. 

आम्ही लवकरच आरोपीला अटक करू

"पोलीस या प्रकरणावर सक्रियपणे काम करत आहेत आणि बलात्कार प्रकरणाबाबत आमच्याकडे काही महत्त्वाचे धागेदोरे आहेत. आम्ही लवकरच आरोपीला अटक करू. आरोपीचा कोणताही राजकीय संबंध नाही, परंतु आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करू असंही कदम म्हणाले. 

    ज्याने हा गुन्हा केला आहे तो आरोपी 

    पुण्यातील बस बलात्कार प्रकरणातील आरोपींचा राजकीय संबंध आहे का, असे विचारले असता, गृहराज्यमंत्री योगेश रामदास कदम म्हणाले की, ज्याने हा गुन्हा केला आहे तो आरोपी आहे आणि आम्ही त्यांना राजकीय व्यक्ती म्हणून पाहत नाही. त्याला आरोपी म्हणून वागवले जाईल, तो कोणत्याही राजकीय व्यक्तीशी संबंधित आहे की नाही याची पोलिसांना पर्वा नाही. त्याचा कारवाईवर कोणताही परिणाम होणार नाही, असं कदम म्हणाले.

    हेही वाचा - Pune Swargate Crime News: परिवहनमंत्री ॲक्शन मोडमध्ये, त्या अधिकाऱ्यांचे निलंबित करण्याचे दिले निर्देश

    पहाटे झाली होती घटना

    पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये हिस्ट्रीशीटर आरोपीनं एका तरुणीवर पहाटे बलात्कार केला होती. मंगळवारी (25 फेब्रुवारी) पहाटे 5.30 वाजता ही घटना घडली. दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

    1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर 

    पुणे पोलिसांनी आरोपीला पकडण्यात मदत करण्याचे जनतेला आवाहन केलं आहे. तसंच, या प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

    आरोपीला फाशीची देण्याची भूमिका

    पुण्यातील बस बलात्कार प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. "आरोपी कोणीही असो, त्याला सोडणार नाही. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि सरकारची त्याला फाशीची देण्याची भूमिका आहे." असं एकनाथ शिंदे म्हणाले.