जेएनएन, मुंबई. लंपीच्या पार्श्वभूमीवर बाधित जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेतील 73 व केंद्र पुरस्कृत पशुस्वास्थ्य,रोग नियंत्रण योजनेतील 80 अशी एकूण 153 फिरती पशुचिकित्सा पथके वैद्यकीय सेवा देत असून रोगाविषयी जनजागृती करत आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिली आहे.

राज्यातील 1 कोटी 39 लाख गोवंशीय पशुधनाच्या तुलनेत लंपी चर्मरोगाने 11 हजार 843 पशुधन बाधित असून ही टक्केवारी अत्यल्प आहे. यापैकी 8 हजार 330 जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. पशुसंवर्धन विभागामार्फत तात्काळ व प्रभावी नियंत्रण उपाययोजना राबविल्या जात आहेत, असंही ते  म्हणाले.

पशू पालकांनी काय काळजी घ्यावी 

  • बांधीत जणावरांना तात्काळ वेगळे करावे  
  • लक्षणं दिसू लागली तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा 
  • गोठ्यामध्ये Sodium Hydrochloride किंवा Phenol याची फवारणी करावी
  • जणावरांना Ivermectin  इंजेक्शन दिल्यास गोचिड किटक यांचे नियंत्रण होते.

यावर नियंत्रण करण्यासाठी काय करावे  

  • गोठ्यामध्ये डास माशा होणार नाही याची काळजी घ्यावी 
  • जणांवरांमध्ये उपचार करताना सुई आणि पंच नवीन वापरावे 
  • साथीचा आजार सुरु आहे तोपर्यंत जणावरांची खरेदी व विक्री थांबवावी 
  • गोठ्याचे निर्जंतुकीकरण करावे.

टीप - वरील सर्व गोष्टी माहिती साठी दिलेल्या आहेत. तरी पशुपालकांनी पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार आपल्या पशुधनावर उपचार करावा.