जेएनएन, कोल्हापूर. Kolhapur Crime News: कोल्हापुरात सासर्‍याकडूनच जावयाचं अपहरण झाल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी दिली आहे.

अपहरण करून जावयाला ठार मारण्याचा प्रयत्न 

मुलीने केलेलं आंतरजातीय लग्न मान्य नसल्याने वडिलांनी हे पाऊल उचललंय. अपहरण करून जावयाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची ही घटना रविवारी करवीर तालुक्यातील भुयेवाडी गावात घडलीय, असं त्यांनी सांगितलं.

कोल्हापूर पोलिसांनी केली तिघांना अटक

या प्रकारानंतर कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखा आणि करवीर पोलिसांनी संयुक्त तपास करुन अपहरण झालेल्या विशाल मोहन अडसूळ या तरुणाला सुखरुप सोडवलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

    या प्रकरणी तिघांना अटक

    याप्रकरणी कोल्हापूर पोलीसांनी तिघांना अटक केली असून यातील चार संशयितांचा अजून शोध सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी दिली आहे.