एजन्सी, मुंबई. Mumbai first GBS fatality: मुंबईतील एका रुग्णालयात 53 वर्षीय पुरूषाचा गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) मुळे मृत्यू झाला आहे, जो GBS मुळे झालेला मुंबईतील पहिला मृत्यू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

GBS चा प्रादुर्भाव 

वडाळा परिसरातील रहिवासी आणि रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करणारा हा रुग्ण पंधरा दिवसांपूर्वी पुण्याला भेट देऊन आला होता, जिथे GBS चा प्रादुर्भाव दिसून आला आहे, असे त्यांनी सांगितले.

अनेक दिवसांपासून गंभीर स्थितीत

23 जानेवारी रोजी त्याला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो अनेक दिवसांपासून गंभीर स्थितीत होता आणि मंगळवारी त्याचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईतील पहिला बळी

    बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त आणि राज्य-नियुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी पुष्टी केली की GBS मुळे झालेला हा मुंबईतील पहिला मृत्यू आहे. अंधेरी (पूर्व) येथील रहिवासी असलेल्या 64 वर्षीय महिलेला मज्जातंतू विकार झाल्याचे निदान झाल्यानंतर मुंबईत 7 फेब्रुवारी रोजी GBS चा पहिला रुग्ण नोंदवला गेला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

    जीबीएस होण्याची प्रमुख कारणे -

    • बॅक्टेरिअर इन्फेक्शन
    • व्हायरल इन्फेक्शन 
    • रोगप्रतिकारशक्ती कमी होणे 
    • दूषित पाणी 

    अशी आहेत जीबीएसची प्रमुख लक्षण

    • शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होने
    • हात, पायात मुंग्या येणे
    • अशक्तपणा जाणवू लागणे.
    • बोलण्यास आणि जेवन करण्यास त्रास होने.
    • स्नायु कमकुवत होने.
    • दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होने आदी प्रमुख लक्षणे आहेत.

    हेही वाचा - अनेक चीनी ॲप्सचे भारतात पुनरागमन, 2020 पासून होती बंदी; TikTok यादीत आहे का? येथे जाणून घ्या