एजन्सी, पुणे: पुण्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील कात्रज बोगद्याजवळ एका निर्जन ठिकाणी 25 वर्षीय आयटी व्यावसायिकाचा मृतदेह आढळला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याची शक्यता

सौरभ स्वामी असे आयटी व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांच्या हत्येमागे काही पूर्ववैमनस्य असावे, असा पोलिसांना संशय आहे.

गुन्हा दाखल

"मंगळवारी सकाळी, पुणे सातारा रस्त्यावरील जुन्या कात्रज बोगद्याजवळील एका निर्जन ठिकाणी स्वामींचा मृतदेह आढळून आला, त्याच्यावर अनेक जखमा होत्या. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. त्याच्या भावाच्या तक्रारीनंतर, अज्ञात व्यक्तीविरुद्ध बीएनएसच्या कलम 103 (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला,” असे पुणे ग्रामीण पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

पुढील तपास सुरू आहे.