पुणे - लक्ष्मीपूजनानिमित्त पुणेकरांसाठी मेट्रो सेवा सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत मेट्रो सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.
मेट्रो प्रशासननुसार, दिवाळी सणानिमित्त कर्मचारी वर्गालाही सण साजरा करण्याची संधी मिळावी, यासाठी ही सेवा वेळ तात्पुरती बदलण्यात आली आहे. 22 ऑक्टोबरपासून मेट्रो सेवा नेहमीप्रमाणे सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत पूर्ववत सुरू होणार आहे.
पुणे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना या बदलाची नोंद घ्यावी, तसेच नियोजनपूर्वक प्रवास करावा, असे आवाहन केलं आहे. अचानक सेवा बंद राहिल्याने होणाऱ्या गैरसोयीबद्दल मेट्रो प्रशासनाने दिलगिरीही व्यक्त केली आहे.
अशी असणार सेवा - 21 ऑक्टोबर (लक्ष्मीपूजन) – मेट्रो सेवा फक्त सकाळी ६ ते संध्याकाळी ६ पर्यंत.
संध्याकाळी 6 ते रात्री 11 – मेट्रो सेवा बंद.
22 ऑक्टोबरपासून – सेवा नेहमीप्रमाणे सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत सुरू.
हा बदल केवळ एका दिवसापुरता असल्याने, नागरिकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन या वेळापत्रकानुसार करावे, असे आवाहन केले आहे.
