एजन्सी, पंढरपूर. Pandharpur Temple Update: संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठूरायाचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक वारकरी हा अतुर असतो. आता वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी (Warkari Community News) आहे. विठ्ठल-रुख्मिणी मंदिर समितीनं नुकतेच झालेल्या बैठकीत मोठा निर्णय (Vitthal Darshan Decision) घेतला आहे. त्यामुळे विठूरायाचं दर्शन अवघ्या दोन तासांत होणार आहे.

पंढरीच्या विठूरायाचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक वारकरी हा अतूर असतो. त्याला विठू दर्शनाची ओढ ही कधीही स्वस्थ बसू देत नाही. यातच आता विठ्ठल-रुख्मिणी मंदिर समितीनं मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे विठूमाऊलीचं दर्शन घेणं हे सुकर होणार आहे. 

टोकन दर्शन पध्दत सुरु करण्याचा निर्णय

विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना- वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रांगेत उभा राहवे लागते, यामुळे वारकऱ्यांना दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात वेळ लागतो. हा वारकऱ्यांचा वेळ वाचवण्यासाठी मंदिर समितीनं टोकन दर्शन पध्दत सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 

बालाजी, वैष्णो देवी मंदिरांच्या धर्तीवर टोकन पद्धत

ज्याप्रमाणे तिरुपती बालाजी, वैष्णो देवी या देवस्थानांवर टोकन पद्धत आहे. त्याच धर्तीवर आता पंढरपूर मध्ये ही टोकन पद्धत सुरु करण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतला आहे.  नव्या वर्षात म्हणजेच पुढील जानेवारी महिन्यात या निर्णयाची अमलबंजावणी होणार असल्याची माहिती विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीनं दिली आहे.  

    दोन तासात विठ्ठल मूर्तीचे दर्शन

    विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीची नुकतेच बैठक झाली आहे. या बैठकीत फेब्रुवारी महिन्यात सुरु होत असलेल्या टोकन पद्धती बद्दल निर्णय झाला. ही पद्धत आता जानेवारी महिन्यात होत असलेल्या माघ महिन्यातील यात्रेत प्राध्यमिक स्वरुपात अवलंबण्याचा निर्णय झाला. समितीनं घेतलेल्या या निर्णयामुळे वारकऱ्यांना केवळ दोन तासात विठ्ठल मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. 

    मोफत टोकन मिळणार

    टोकन पद्धत अवलंबण्यासाठी हैदराबाद येथील एका कंपनीला काम देण्यात आले आहे. त्यांनी यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी केली आहे. या कंपनीनं नुकतेच मंदिर परिसरात आढावा घेतला आहे. नंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ही कंपनी मोफत टोकन देणार आहे. माघ यात्रेदरम्यान झालेल्या प्राथमिक तपासणीनंतर फेब्रुवारी पासून या पद्धतीला कायम स्वरुपी सुरु करण्याबाबत निर्णय होऊ शकतो.