जेएनएन, पुणे: मुंढव्यातील बहुमूल्य सरकारी जमिनीवर 2018 पासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचीच नजर होती, असा गंभीर आरोप समाजसेविका अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या माजी उपमहापौरांचे नाव समोर येत असून प्रकरणाला मोठं राजकीय व आर्थिक वळण लागलं आहे

अजित पवार यांचा मोहरा उपमहापौर होता! 

मुंढवा परिसरातील वादग्रस्त जमिनीच्या व्यवहारात राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर व मगरपट्टा सिटीचे डायरेक्टर निलेश मगर हे “मोठे प्लेअर” असल्याचा दावा दमानिया यांनी केला. मगर यांना पुढे करून अजित पवार यांनीच जमीन हडपण्याचा प्लान केला असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे.

दमानिया यांनी सांगितले की, 2018 पासून या जमिनीवर पवार गटाचे राजकीय आशिर्वाद असल्यामुळे अनेक कथित अनियमित व्यवहार मार्गी लागले. 

खारगे समितीसमोर चौकशीची मागणी! 

राज्य सरकारने नेमलेल्या खारगे समितीसमोर निलेश मगरांची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. जमीन व्यवहारामध्ये चुकीचे दस्तऐवज, अनियमित पॉवर ऑफ अटर्नी,जमीन मूळ मालकांची दिशाभूल,अशा अनेक गंभीर आरोप दमानिया यांनी केले आहे. 

    जमिनीचे बाजारमूल्य का लपवले? 

    या जमिनीचे बाजारमूल्य प्रचंड असतानाही, कमी किमतीत व्यवहार दाखवण्यात आला आणि सरकारी महसुलाला मोठा फटका बसला, असा आरोप देखील दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांच्या म्हणण्यानुसार हा व्यवहार “मोठा जमीन घोटाळा” असून त्यामध्ये राजकीय नेत्यांचा थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे.

    अजित पवार अडचणीत! 

    अंजली दमानियांच्या आरोपानंतर या प्रकरणात अजित पवार यांची अडचण वाढली आहे. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची सुद्धा चौकशी होण्याची भीती निर्माण झाली आहे. विरोधक अजित पवार गटावर निशाणा साधत असून पार्थ पवार यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.