जेएनएन, नाशिक. Nashik Crime News: राज्यात मागील काही दिवसांत महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यातच आता उपचारसाठी आलेल्या एक अल्पवयीन मुलीवर डॉक्टरकडून अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक पोलिसकडून अत्याचार करणाऱ्या डॉक्टरला अटक केली आहे. संगमनेरमध्ये उपचार करण्यासाठी आलेल्या महाविद्यालयीन 16 वर्षीय मुलीवर डॉक्टरने अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

उपचार करण्याच्या बहाण्याने डॉक्टरने केला अत्याचार 

महाराष्ट्रात अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. संगमनेर शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर उपचार करण्याच्या बहाण्याने डॉक्टरने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न एरणीवर आला आहे. 

श्वसनाचा त्रास होत असल्याने आली होती उपचारासाठी

कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला श्वसनाचा त्रास होत असल्याने तिला डॉ कर्पे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 16 वर्षीय मुलीवर उपचार दरम्यान डॉक्टरनी मुलीच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर डॉक्टर त्या मुलीला टेरेसवर घेऊन गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मुलीने अनेकदा विरोध केला. मात्र, डॉक्टरांनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले असल्याची तक्रार करण्यात आली. दरम्यान पोलिसाने डॉक्टरला नाशिकमधून अटक केले आहे.

    जीवंत मारण्याची धमकी

    अत्याचारची घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी तपास करून डॉक्टर अमोल कर्पे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिताने दिलेल्या फिर्यादीत अत्याचार केल्यानंतर कोणालाही काही सांगितल्यास जीवंत मारण्याची धमकी डॉक्टरकडून देण्यात आली होती.

    नाशिक येथून रात्री डॉक्टरला अटक

    अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून 6 एप्रिल रोजी डॉक्टर फरार झाला होता. या घटनेनंतर आरोपी फरार असल्याने संगमनेर शहर पोलिसांनी तात्काळ पथक पाठवून नाशिक येथून रात्री डॉक्टरला अटक केले आहे.