जेएनएन, मुंबई: सायबर गुन्हेगारी रोखणे आणि सायबर गुन्हेगारांना पकडणे हे भविष्यातील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. हे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सज्ज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबईतील सर्वच पोलीस स्थानकांमध्ये महिला तसेच नागरिक केंद्रीत सोयी सुविधांची उभारणी करण्यात आली असून पोलीस स्थानके ही जास्तीत जास्त लोकाभीमूख झाले असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र हा सायबर गुन्हेगारी नियंत्रणामध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्याची मुंबई पोलीसांची क्षमता मोठी आहे. सायबर गुन्ह्याच्या एक प्रकरणात 12 कोटी रुपये वाचवण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे.
अत्याधुनिक तीन सायबर लॅबचे लोकार्पण
भविष्यातील सायबर गुन्ह्यांचे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दलाने आतापासूनच अनेक उपक्रम हाती घेतले असून सायबर गुन्हे रोखण्यासाठी महत्वाचे असलेले अत्याधुनिक तीन सायबर लॅब उभारण्यात आले आहे. या लॅबचे आज लोकार्पण करण्यात येत आहे. डीजिटल अरेस्ट सारख्या प्रकरणांमध्ये चांगले सुशिक्षीत लोकही पैसे देत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सुशिक्षीत असलेल्या डिजीटल अशिक्षीतांनाही शिकवण्याची गरज आहे. त्यासाठी जनजागृती महत्वाची आहे. त्यासाठीही मुंबई पोलीस विविध उपक्रम राबवत आहे. त्यांच्या या उपक्रमात साथ देणारे अभिनेते अयुष्यमान खुराणा आणि निर्माते साहित कृष्णन यांचे अभिनंदन करतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
हेही वाचा - MGNREGA Maharashtra: ग्रामीण भागात रोजगारात 2.55 टक्के वाढ, मनरेगात महाराष्ट्र अव्वल स्थानी
मुंबईच्या सायबर सज्जतेचा नवा अध्याय!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 7, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाणे, मुंबई येथील 'निर्भया सायबर लॅब'चे उदघाटन केले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'निर्भया सायबर लॅब' येथील स्टाफ रुम, कॉन्फरन्स रुम, अधिकारी कक्ष यांची पाहणी केली. यावेळी… pic.twitter.com/r9FdJEFDrN
स्थानकात महिला व बाल सहाय्यता कक्ष निर्माण
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने आणलेले नवीन तीन कायदे हे खऱ्या अर्थाने भारतीय असल्याचे सांगून गुन्हे प्रकटीकरण, पुरवा याविषयीच्या कायद्यामुळे आता गुन्ह्यांवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. गुन्ह्याच्या तपसकामी तंत्रज्ञान वापरासही आता परवानगी मिळालेली आहे. महिलांमध्येही आता बदल होत असून पुर्वी समाजिक दबावांमुळे महिलांविषयीच्या गुन्ह्यांची नोदणी कमी होती आता त्यामध्ये वाढ झाली आहे, ही एक चांगली बाब आहे. महिलांविषयीचे गुन्हे रोखण्यासाठीही आणि महिलांना पोलिसांविषयी विश्वास वाटावा यासाठी पोलीस स्थानकांमध्ये महिला व बाल सहाय्यता कक्ष निर्माण करण्यात आला आहे. यामुळे महिलांविषयीचे गुन्हे नोंदवताना त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण येणार नाही याची खात्री असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा - Maharashtra Heat Wave: अकोल्यात तापमान पोहोचले 43.2 अंशांवर, तुमच्या जिल्ह्यात किती, वाचा सविस्तर
पोलीस दलाचा कायाकल्प
पार्क साईट पोलीस स्थानकांची नुतन इमारत उत्कृष्ट झाली असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, तसेच आझाद मैदान पोलीस स्थानकामधील उत्कर्ष सभागृहाचे काम ही उत्कृष्ट झाले असून याला पूर्वीचे एकिहासिक रुप पुन्हा प्राप्त झाले आहे. शासनाने प्रत्येक विभागाला 100 दिवसांचा कार्यक्रम आखुन दिला होता. या 100 दिवसांच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट पालन मुंबई पोलीस दलाने केले आहे. पोलीस दलाचा कार्याकल्प झाला आहे. याशिवाय राज्यात महिला पोलीस स्थानक उभारण्याऐवजी प्रत्येक पोलीस स्थानकामध्ये महिला पोलीस अधिकारी, अंमलदार यांची नेमणूक करून पोलीस दलाचे कामकाज जास्तीत जास्त महिलाभिमुख करणयात आल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.