जेएनएन, मुंबई. Maharashtra Summer News: एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात अनेक ठिकाणी तापमानात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. अकोला शहर आज राज्यातील सर्वात उष्ण शहर ठरले, जिथे कमाल तापमान 43.2 अंश सेल्सिअसवर पोहोचले. हवामान खात्याने पुढील तीन दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे.

काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता

पुणे, नागपूर, जळगाव, नाशिक, सोलापूर, परभणी, अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या शहरांमध्येही तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. पश्चिमेकडील भागातून येणाऱ्या गरम वाऱ्यांमुळे (वेस्टर्न डिस्टर्बन्स) तापमानात वाढ झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये):

  • अकोला: 43.2
  • पुणे: 39.2
  • जळगाव: 42.3
  • नाशिक: 40.2
  • सोलापूर: 41.4
  • परभणी: 40.1
  • अमरावती: 42.6
  • चंद्रपूर: 42.2
  • नागपूर: 42.2
  • वर्धा: 41.1
  • यवतमाळ: 42.4
  • छत्रपती संभाजी नगर : 40.2
  • गोंदिया - 40.4
  • मुंबई - 33.9

हेही वाचा - Mumbai Crime News: कार चालकाकडून शरीर सुखाची मागणी, प्रेमी जोडपं हत्या करुन झालं पसार, अखेर अटक