एजन्सी, पालघर. Palghar Latest News: पालघर जिल्ह्यात एका नदीत पोत्यात भरलेला अज्ञात महिलेचा मृतदेह मंगळवारी आढळून आला, असे पोलिसांनी सांगितले.
पोतं उघडल्यावर पोलिसही चक्रावले
नाशिक-मोखाडा-जव्हार रस्त्यावरील घाटकरपाडा येथील वाघ नदीत एक पोते तरंगत असल्याची माहिती गावकऱ्यांनी सकाळी पोलिसांना दिली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी त्या पोत्याला ताब्यात घेतलं. पोतं उघडल्यावर पोलिसही चक्रावून गेले. पोलिस पथकाला पोत्यात 20 वर्षांच्या महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला, असे त्यांनी सांगितले.
गुन्हा दाखल
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय न्याय संहितेच्या 103 (1)(खून) आणि 238 (पुरावा नष्ट करणे) कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेचा गळा आवळून खून
महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला आणि तिचा मृतदेह पोत्यात भरून नदीत फेकून देण्यात आला असावा, असे दिसते, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा - Latur News: गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा, शिक्षकानं केलं मुलाचं लैंगिक शोषण, नराधमाला अटक
यापूर्वी आढळले होते शिर नसलेले धड
यापूर्वी पालघर जिल्ह्यात महिलेचे शिर नसलेले धड सापडले होते. त्यामुळे पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्याप्रकरणाचा निकाल लागला नसतानाच पालघर पोलिसांसमोर आणखी एक प्रकरण उभे राहिले आहे. पोलिस या पोत्यातील महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.