जेएनएन, मुंबई. Maharashtra Politics: गोपीनाथ मुंडे यांची मुलगी पंकजा मुंडे यांचा राजकारणातून संपविण्यासाठी धनंजय मुंडे यांनी सुपारी दिली होती, असा आरोप सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांचे जवळीक असलेले राजेंद्र घनवट यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधातील सर्व पुरावे गोळा केले असून ते पुरावे आजही घरात पडलेले असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. पंकजा मुंडे यांच्या विरोधातील सर्व पुरावे अजूनही साबीत ठेवले आहे, असा दावा ही दमानिया यांनी केला आहे.
पुराव्याच्या फाईल्स गोळा केल्याचा दावा
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे जरी बहीण भाऊ असले तरी काही वर्षांपूर्वी पंकजा मुंडेंविरोधातले पुरावे घेऊन धनंजय मुंडे माझ्या घरी फेरी मारत होते, असा आरोप दमानिया यांनी केला आहे. पंकजा मुंडेंविरोधात राजेंद्र घनवट यांनी पुराव्याच्या फाईल्स गोळा केल्याचा दावाही अंजली दमानिया यांनी केला आहे.
हेही वाचा - Aurangzeb Tomb Row: मनसेच्यावतीने औरंगजेबाच्या कबरीवरून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, केल्या या पाच मागण्या
धनंजय मुंडे आणि राजेंद्र घनवट यांचे संबंध
पंकजा मुंडेंविरोधात राजेंद्र घनवट आणि धनंजय मुंडेंनी आणलेल्या फाईल्स आजही घरात पडून आहे. मी असे काम करत नाही, असेही त्यावेळी सांगितल्याचा दावाही त्यांनी केला आहे. धनंजय मुंडे आणि घनवट यांच्यात प्रचंड सख्य असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. जसे संबंध वाल्मिक कराड सोबत होते तसेच संबंध धनंजय मुंडे आणि राजेंद्र घनवट यांचे आहेत असा दावा ही दमानिया यांनी केला आहे.
घनवट यांनी दावा फेटाळला
धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे विरोधात सुपारी दिली होती, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. तो दावा पोपट घनवट यांनी फेटाळला आहे. अंजली दमानियांच्या घरी कधीही गेलो नाही, असा दावा पोपट घनवट यांनी केला आहे. दमानिया यांनी केलेले दावे सर्व खोटे आहेत, असं ते म्हणाले.