जेएनएन, नाशिक. Apmc Lasalgaon Onion Price: लासलगांव कृषि उत्पन्न बाजार समितीत 8100 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. कांद्याला लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत 1370 रुपये भाव मिळाला आहे. काल 1300 रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. त्या तुलनेत आज 70 ते 100 रुपयांनी अधिक भाव मिळाला आहे. मात्र, तरीही मागील काही दिवसांच्या तुलनेत कांद्याचे भाव हे पडलेलेच आहेत. 

लाल कांद्याला किमान 800 रुपये तर कमाल 1463 रुपये भाव मिळाला असून सर्वसाधारण लाल कांद्याची खरेदी 1350 रुपये भावाने झाली आहे. तसंच, उन्हाळ कांद्याला भाव हा किमान 900 रुपये तर कमाल 1786 रुपये भाव मिळाला असून सर्वसाधारण लाल कांद्याची खरेदी 1551 रुपये भावाने झाली आहे.  

लासलगाव बाजार समितीच्या माहितीनुसार (5 वाजता पर्यंत)

हेही वाचा - Ahilyanagar News: संगमनेर येथील वीर जवान रामदास बडे अनंतात विलीन 

शेतीमालकिमान भाव (₹/क्विंटल)कमाल भाव (₹/क्विंटल)सर्वसाधारण भाव (₹/क्विंटल)
कांदा
लाल कांदा80014631370
उन्हाळ कांदा90017861551
धान्य
सोयाबीन350040354005
गहू247530462760
बाजरी212030712699
ज्वारी220022512251
मूग520166006600
हरभरा (लोकल)390154515300
हरभरा (काळा)390154515300
हरभरा (गुलाबी)---
मका214023102270
तूर635165006400
उडीद500055005001