जेएनएन, भंडारा. Blast at ordnance factory in Bhandara:  भंडारा जिल्ह्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची माहिती आहे. भंडारा जिल्ह्यात झालेल्या शस्त्रसाठ्याच्या कारखान्यातील स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

घटनास्थळी बचाव आणि वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत आणि बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती नागपूर संरक्षण जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

घटनास्थळी बचाव कार्य सुरु

जवाहर नगर भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये झालेल्या अपघाती स्फोटानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत, सध्या बचाव कार्य सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी भंडारा संजय कोलते यांनी दिली आहे. (Blast in Bhandara)

2 जणांना वाचवण्यात यश

     एक छत कोसळले आहे जे जेसीबीच्या मदतीने काढण्याचे काम सुरू आहे. एकूण 12 जण तिथे असल्याची माहिती आहे, त्यापैकी 2 जणांना वाचवण्यात यश आले आहे, असं जिल्हाधिकारी भंडारा संजय कोलते यांनी सांगितलं.

    'हे मोदी सरकारचे अपयश'

    भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत झालेल्या स्फोटावरुन काँग्रेस प्रदेध्याध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. "हे मोदी सरकारचे अपयश आहे." असं ते म्हणाले.

    बचाव कार्यासाठी यंंत्रणा दाखल

    भंडारा जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील स्फोटाच्या घटनेत छत कोसळून 13 ते 14 कामगार अडकल्याचे वृत्त आहे. त्यातील 5 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी असून सर्व प्रकारची मदत पुरवण्यात येत आहे. बचाव कार्यासाठी एसडीआरएफ तसेच नागपूर महापालिकेची चमू सुद्धा पाचारण करण्यात आल्या असून त्या लवकरच पोहोचतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसंच, या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याचं ते म्हणाले.