जेएनएन, नागपूर. Maharashtra Assembly Winter Session Nagpur: किरकोळ विदेशी मद्य विक्री आणि किरकोळ देशी मद्य विक्री दुकानांच्या बाबतीत स्थलांतरासाठी यापुढे नोंदणीकृत सोसायटीची 'ना हरकत' घेणे बंधनकारक राहील आणि या निर्णयाची राज्यात सर्वत्र अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.

नियमबाह्य दारू दुकानांचे परवाने रद्द करण्याचा प्रश्न

पिंपरी- चिंचवड येथील काळेवाडी-रहाटणी परिसरातील नियमबाह्य दारू दुकानांचे परवाने रद्द करण्याबाबत सदस्य शंकर जगताप यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

त्या दोन्ही दुकानांचा परवाना निलंबित

पिंपरी चिंचवड मधील बजाज देशी दारू दुकान आणि विक्रांत वाईन्स शॉप या दोन्ही दुकानांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. परंतु त्यातील एकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.