जेएनएन, नागपूर: पवई इथे रोहित आर्या (Rohit Arya) नामक व्यक्तीने काही मुलांना ओलिस ठेवून सरकारकडे थकीत असलेले पैसे मागितले होते. यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाई त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणावर रोहित आर्या याचा एन्काऊंटर का करण्यात आला? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी विचारला.
वडेट्टीवार यांचा सवाल
विधानसभेत आज लक्षवेधीच्या माध्यमातून रोहित आर्या प्रकरण बाबत काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी प्रश्न मांडले. आर्यांने महायुती सरकार असताना स्वच्छता मॉनिटर आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या प्रोजेक्टवर काम केले होते. त्याचे पैसे सरकारने थकवले होते. त्याने व्हिडिओ काढून सांगितले माझे पैसे द्यावे ,मी दहशतवादी नाही. अस असताना रोहित आर्यांचे एन्काऊंटर का करण्यात आले? पायावर गोळी का मारली नाही? नेमकी त्याचवेळी एन्काऊंटर स्पेशलिस्ट पोलिस कसा काय तिथे उपलब्ध होता? असे प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.
तत्कालीन मंत्र्यांनी पैसे थकवल्याने ही घटना - विजय वडेट्टीवर
या प्रकरणी रोहित आर्या याने वारंवार आंदोलन केले, उपोषण करून पैसे मागितले होते. पण तत्कालीन मंत्र्यांनी पैसे थकवल्याने ही घटना घडली. या प्रकरणी माजी मंत्र्यांची चौकशी केली का? सरकारकडे पैसे प्रलंबित आहे का? असा प्रश्न वडेट्टीवर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला.
रोहित आर्या दहशतवादी नसताना त्याचे एन्काऊंटर का केले?
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) December 9, 2025
तत्कालीन मंत्र्यांनी पैसे थकवले त्यांची चौकशी केली का?
पवई इथे रोहित आर्या नामक व्यक्तीने काही मुलांना ओलिस ठेवून सरकारकडे थकीत असलेले पैसे मागितले. रोहित आर्या याचा खून का करण्यात आला?
आर्यांने महायुती सरकार असताना… pic.twitter.com/fksDnYAKDs
पोलिसांनी स्वरक्षणासाठी कारवाई केली
यावेळी उत्तर देताना मंत्र्यांनी या प्रकरणी चौकशी सुरू आहे. रोहित आर्याने लहान मुलांना ओलिस धरले म्हणून पोलिसांनी स्वरक्षणासाठी कारवाई केल्याचे स्पष्ट केले. मानवी हक्क आयोगाने समिती नेमून चौकशी करायला सांगितले त्यानुसार चौकशी सुरू आहे. यातील संबंधितावर कारवाई होईल, असं आश्वासन मंत्र्यांनी दिले.
