जेएनएन, नागपूर. Nagpur Latest News: नागपूरमध्ये झालेल्या 17 व्या रोजगार मेळाव्यात एक अनपेक्षित आणि लज्जास्पद घटना घडली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोरच टपाल विभागातील दोन महिला अधिकारी एकमेकींशी भिडल्या आहेत. कारण होतं — एकाच खुर्चीसाठीचा वाद!
असा घडला प्रसंग
नागपूरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सुमारे 51 हजार तरुणांना नियुक्तिपत्रे वाटली. नागपूर येथील कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्थानिक खासदार, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. गडकरी व्यासपीठावर बसलेले असताना त्यांच्या शेजारी असलेल्या सोप्यावर टपाल विभागाच्या दोन महिला अधिकारी बसल्या होत्या. या सोप्यावर प्रत्यक्षात केवळ एकाच अधिकाऱ्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आली होती, तसेच त्या जागेवर बसणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असलेली पाटीही ठेवण्यात आली होती. मात्र, दोघी महिला अधिकारी ज्यांपैकी एकीची बदली दक्षिण भारतात झाली असूनही त्या अद्याप मुख्यालय सोडलेले नव्हते. त्या दोघीही व्यासपीठावर उपस्थित झाल्या. एकाच खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न करू लागल्या.
व्यासपीठावरच धक्काबुक्की
प्रथम हसत-खेळत सुरू झालेला हा प्रसंग काही क्षणांतच गंभीर झाला. दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीसाठी धक्काबुक्की झाली, एकमेकींना ढकलण्याचा प्रकार घडला. हा सर्व प्रकार व्यासपीठावर, केंद्रीय मंत्र्यांच्या समोरच झाला.
On stage drama 😛
— Archana Pushpendra (@archanapsp) October 25, 2025
नागपुर में सरकारी कार्यक्रम में पोस्ट ऑफिस की दो सिनियर महिला अधिकारियों के बीच स्टेज पर हुआ विवाद
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की मौजूदगी में दो महिला अधिकारियों के बीच झगड़ा हुआ।#women pic.twitter.com/PUSLAznBAo
गडकरींचा संताप
या संपूर्ण प्रकाराकडे पाहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काहीसे वैतागले. त्यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांना सूचित करून परिस्थिती आटोक्यात आणली. कार्यक्रम काही क्षण थांबवावा लागला. नंतर दोन्ही अधिकाऱ्यांना व्यासपीठावरून हटवण्यात आले आणि कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला.
प्रशासनात खळबळ
या घटनेनंतर टपाल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेत चौकशी सुरू केली आहे. सार्वजनिक कार्यक्रमात अशा पद्धतीचा प्रकार घडल्याने विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
