जेएनएन, नागपूर: नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने दुसऱ्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या 10 झोन कार्यालयांमध्ये निवडणूक निर्णय अधिका-यांची नियुक्ती केली आहे. येत्या 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या दिवशी 2060 अर्जाची उचल झाली आहे. मागील दोन दिवसात एकूण 4157 नामनिर्देशनपत्रे वाटप करण्यात आले आहे.
नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी मंगळवार पासून उमेदवारी अर्ज वाटप करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. शहरातील 10 झोनमध्ये संबंधित प्रभागातील इच्छुक उमेदवार निवडणूक निर्णय अधिका-याकडे अर्ज उपलब्ध असून, दहाही झोन मध्ये उमेदवारांना अर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.
2060 उमेदवारी अर्जाचे वाटप
बुधवारी लक्ष्मीनगर झोन क्र.1 मध्ये 128 अर्ज, धरमपेठ झोन क्र. 3 मध्ये 131अर्ज, हनुमाननगर झोन क्र.3 मध्ये 367 अर्ज, धंतोली झोन क्र.4 मध्ये 235 अर्ज, नेहरुनगर झोन क्र.5 मध्ये 248 अर्ज, गांधीबाग झोन क्र.6 मध्ये175 अर्ज, सतरंजीपूरा झोन क्र.7 मध्ये 192 अर्ज, लकडगंज झोन क्र.8 मध्ये 134 अर्ज, आशीनगर झोन क्र.9 मध्ये 217 अर्ज, मंगळवारी झोन क्र.10मध्ये 233 असे एकूण 2060 उमेदवारी अर्जाचे वाटप करण्यात आले आहे.
‘नाताळ’ निमित्त आज सुट्टी
25 डिसेंबर रोजी 2025 रोजी “नाताळ” निमित्त सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे देण्यात व स्वीकारण्यात येणार नसल्याची दाखल इच्छुकांनी घ्यावी, असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.
हेही वाचा: NMC Election 2026: मनपा सार्वत्रिक निवडणूकच्या अनुषंगाने आयुक्तांनी केली स्ट्राँग रूमची पाहणी
