जेएनएन,भंडारा: येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. भंडाऱ्यात आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना पटोले यांनी पक्षनिष्ठेबाबत कठोर भूमिका घेतली आणि “पक्षाशी बेइमानी करणाऱ्यांच्या घरात घुसून मारू” असे वक्तव्य केले.

मेळाव्यातील वक्तव्यामुळे खळबळ
भंडारा येथे झालेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात नाना पटोले म्हणाले,“पक्षाशी एकनिष्ठ राहणं आवश्यक आहे. पक्षात राहून बेइमानी करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. जे फितूर होतील, त्यांच्या घरात घुसून मारू.”

या वक्तव्यानंतर सभागृहात कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा गजर केला असला तरी, राजकीय वर्तुळात मात्र या वक्तव्याची तीव्र चर्चा सुरु झाली आहे. विरोधकांनी पटोले यांच्या वक्तव्याला "राजकीय धमकी" म्हटले आहे.

हेही वाचा: सोलापूर शहरात पुन्हा मुसळधार पाऊस; अनेक भागात पाणी साचले, नागरिक त्रस्त