जेएनएन, नागपूर. Nagpur Violence: नागपुरात काही दिवसांपूर्वी औंरगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवरुन झालेल्या निदर्शनानंतर काही अफवा पसरल्यानंतर हिंसाचाराची घटना घडली होती. याहिंसाचार प्रकरणात आतापर्यंत, सुमारे 114 लोकांना आम्ही ताब्यात घेतले आहे, आणि याशिवाय, समोर येणाऱ्या कोणत्याही नवीन माहितीवरही आम्ही कारवाई करत आहोत, अशी माहिती पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी सांगितलं.
114 लोकांना ताब्यात घेतलं
नागपूर शहरात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. या संदर्भात बोलताना पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी माध्यमांना माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत या प्रकरणात सुमारे 114 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांमध्ये हिंसाचारात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे, तसेच हिंसाचारास प्रोत्साहन देणाऱ्या किंवा मदत करणाऱ्या संशयितांचाही समावेश आहे.
कसून तपास सुरु
पोलीस आयुक्त सिंघल यांनी पुढे सांगितले की, तपास अजूनही सुरू आहे आणि तपासादरम्यान समोर येणाऱ्या प्रत्येक नवीन माहितीची गंभीर दखल घेतली जात आहे. या हिंसाचारामागे नेमके कोण जबाबदार आहेत, याचा शोध घेण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत. तसेच, या घटनेत सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल.
सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा
दरम्यान, अल्पसंख्याक लोकशाही पक्षाचे (एमडीपी) शहर प्रमुख फहीम खान यांच्यासह सहा जणांवर सायबर पोलिसांच्या एफआयआरमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे सायबर क्राईमचे डीसीपी लोहित मतानी यांनी सांगितले.
आयाती जाळल्याची अफवा ठरली कारणछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या मुघल सम्राट औरंगजेबाच्या कबरीला हटवण्याची मागणी करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) नेतृत्वाखालील आंदोलनादरम्यान आयाती जाळल्याची अफवा सोमवारी हिंसाचाराचे प्राथमिक कारण ठरली, असही लोहित मतानी यांनी म्हटलं आहे.