जेएनएन, मुंबई. Raigad News: रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिकेने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भटके श्वान आणि मांजरांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. असं करणारी देशातील पहिली महानगरपालिका पनवेल आहे, असं पनवेल पालिकेचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी सांगितलं.
40 टक्के भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण
या सर्वेक्षणामुळे रेबीजमुक्त शहर बनवण्यास मदत होणार असून, 40 टक्के भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण झाल्याचे निष्पन्न झाले आहे, असं ते म्हणाले.
2 फिरते दवाखाने सुरू करण्याची प्रक्रिया सुरू
या सर्वेक्षणाच्या अहवालानंतर महापालिकेने श्वान व मांजरांच्या लसीकरण आणि निर्बीजीकरणासाठी पुढचे पाऊल उचलले आहे. एप्रिलपासून पालिका क्षेत्रात दोन फिरते दवाखाने सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य विभाग उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी दिली.
हेही वाचा - Derogatory Remarks About Shivaji Maharaj: पत्रकार प्रशांत कोरटकर यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी
एआयच्या माध्यमातून देशात प्रथमच भटके श्वान आणि मांजरांचे सर्वेक्षण
पनवेल महापालिकेने एआयच्या माध्यमातून देशात प्रथमच भटके श्वान आणि मांजरांचे सर्वेक्षण पूर्ण करणार आहे, भविष्यात रेबीजमुक्त शहरासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे, असं ते म्हणाले.