जेएनएन, नागपूर. Nagpur Ghibli Scam News: सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वीच घिबलीचा ट्रेंड जोरात सुरू आहे. मात्र, या घिबलीचा वापर करत सायबर चोरांचा सुळसुळाट सुटला आहे. या घिबली ट्रेंडचा फायदा सायबर गुन्हेगारांनी घेतला आहे. ज्यामुळे अनेक लोकांच्या बँक खात्यांमधील रक्कम गायब झाली आहे.
लिंकवर क्लिक करताच
तंत्रज्ञानाच्या मदतीने घिबली हा ट्रेंड सुरू झाला. यामध्ये घिबली स्टाईलने फोटो तयार करण्यासाठी अनेक जण फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअप, इन्स्टाग्रामवर आलेल्या लिंक ओपन करतात. या लिंकवर क्लिक करताच सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात नागरिक अडकू लागले आहेत.
मेक अ घिबली फोटो
सायबर गुन्हेगारांनी "मेक अ घिबली फोटो" याची लिंक पाठवून नागरिकांना फसवणे सुरू केले आहे. या लिंकवर क्लिक करताच, त्यांना बँक खात्याची आणि मोबाइल फोन माहिती विचारली जाते. अनेक जण या फसवणुकीच्या जाळ्यात अडकले. या युजर्सच्या बँक खात्यातून थोड्या वेळातच पैसे गायब होण्याच्या तक्रारी नागपूर पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
"कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, आणि बँक खात्याची संवेदनशील माहिती कुणाला देखील देऊ नका," असे पोलिसांनी म्हटले आहे. सायबर गुन्हेगारांचा वाढता धोका लक्षात घेता, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. नागरिकांना सावध राहण्याची सूचनाही पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा - Devgiri Fort Fire: सिगारेटच्या ठिणगीमुळे देवगिरी किल्ल्याला भीषण आग; 40 घोरपडी आगीत जळून खाक
खात्यातून पैसे काढण्याचे काम
फेसबुक, व्हाट्सअप, यूट्यूब, आणि इंस्टाग्रामवर पसरलेली ही लिंक नागरिकांना आकर्षित करत आहे, आणि अनेक जण त्यात फसून खात्यातून पैसे गमावत आहेत. यामध्ये केवळ बँक खात्याची माहिती नाही, तर काही घटनांमध्ये सायबर गुन्हेगारांनी मोबाईल नंबर हॅक करून खात्यातून पैसे काढण्याचे काम केले आहे.