छत्रपती संभाजी नगर. Devgiri Fort Fire Latest News: छत्रपती संभाजी नगरमधील प्रसिद्ध किल्ला दौलताबाद येथील देवगिरी किल्लाला आग लागल्याची घटना काल घडली. किल्ला परिसरात भीषण आग लागल्याने जवळपास 40 घोरपडी जळाल्या आहे. सिगरेटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
उन्हामुळे गडाच्या परिसरातील वाळलेलं गवत असल्याने आग झपाट्याने पसरली आणि आगीने या गडाला विळखाच घातल्याचे दिसून आले आहे.
40 वर घोरपडी जळाल्या
देवगिरी किल्ल्याच्या चारही बाजूला धुराची लाटाच उठलेले दिसून आले आहे. देवगिरी किल्लाला आग लागल्याने स्थानिकाच्या चिंता वाढली आहे. या आगीत 100 पेक्षा जास्त झाड जळाली, तर 40 वर घोरपडी जळाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. तर यामध्ये 25 पेक्षाजास्त मोर आणि अनेक पक्षी होरपळले असल्याची माहिती आहे.
हेही वाचा - Mumbai Metro: देशातील दुसरी पाण्याखालील मेट्रो मायानगरी मुंबईत धावणार, कुठे-कधी होणार सुरु, वाचा सविस्तर…
तब्बल 12 तासांच्या परिश्रमानंतर आग विझली
देवगिरी किल्ल्यावरील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक विभागाने जोरदार प्रयत्न केला असून तब्बल 12 तासांच्या परिश्रमानंतर आग विझवण्यात यश आले आहे. देवगिरी किल्यावर आगीपासून संरक्षणासाठी कायमस्वरूपी यंत्रणा बसवण्याची गरज असल्याची मागणी स्थानिक नागरिककडून केली जात आहे.