जेएनएन, मुंबई. Maharashtra Nagpur Vidhan Sabha Election Result 2024:  महाराष्ट्रात घेण्यात आलेल्या 15 व्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज घोषित करण्यात आला. राज्यभरात महायुती सरकार आघाडीवर असून, महाविकास आघाडीने पाहिजे तितकी चांगली कामगिरी केलेली नाही. विधानसभा निवडणुकीत नागपूर जिल्ह्यातील दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी 129401 मतांनी विजय मिळवला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात असलेले काँग्रेसचे पक्षाचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे पाटील यांना 89691मते मिळाली आहे.


नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ - 52 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ नागपूर जिल्ह्यात आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, 2008 नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार आहे. नागपूर दक्षिण पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विद्यमान आमदार देवेंद्र फडणवीस

नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघतून भाजपचे देवेंद्र फडणवीस विरुद्ध काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे पाटील निवडणूक लढवत आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार संघातून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे देवेंद्र फडणवीस हे १०९२३७ मतांनी जिंकले होते. तर काँग्रेसचे डॉ. आशिष देशमुख यांना ५९८९३ मते मिळाली होती. भाजपचे देवेंद्र फडणवीस हे ४९४८२ मतांच्या फरकांनी जिंकून आले होते. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघतून  भाजपचे देवेंद्र फडणवीस विद्यमान आमदार आहेत. 

2024 विधानसभा मधील लढत 

    2019 च्या विधानसभा निवडणुकीत  भाजपचे देवेंद्र फडणवीस हे आमदार म्हणून निवडून आलेले आहे. 2024 च्या निवडणुकीत  भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे पाटील निवडणूक लढवत आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघतून चार वेळा जिंकून आले आहेत. पाचव्यांदा देखील देवेंद्र फडणवीस मतांनी जिंकले आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीतदेवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी 129401 मतांनी विजय मिळवला आहे.

    पक्षउमेदवारमत 
    भारतीय जनता पक्षदेवेंद्र गंगाधरराव फडणवीस129401
    काँग्रेसप्रफुल गुडधे पाटील89691