जेएनएन, गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे येथील एकूण 785 गावे बाधित झाल्याचा अंदाज आहे. 35578 शेतकऱ्यांच्या 13955.4 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले, असल्याचा प्राथमिक नजरअंदाजित अहवाल आहे.

गोंदिया जिल्ह्यात दिनांक 25 व 26 ऑक्टोबर रोजी गोंदिया जिल्ह्यातील अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे प्राथमिक नजर अंदाजित अहवाल सादर झाला असून यामध्ये सर्वाधिक नुकसान गोंदिया तालुक्यातील असल्याचे निरीक्षण आहे.

जिल्ह्यातील शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे प्राथमिक नजरअंदाजित अहवालानुसार,

गोंदिया तालुका- बाधीत गावे-137, अंदाजे बाधित क्षेत्र-7428.00, अंदाजे बाधित शेतकरी संख्या 20000, बाधित पिके- भात. 

गोरेगाव तालुका- बाधीत गावे-52, अंदाजे बाधित क्षेत्र-831.00, अंदाजे बाधित शेतकरी संख्या 1894, बाधित पिके- भात. 

तिरोडा तालुका- बाधीत गावे-116, अंदाजे बाधित क्षेत्र-556.00, अंदाजे बाधित शेतकरी संख्या 1390, बाधित पिके- भात. 

    मोरगाव अर्जुनी तालुका- बाधीत गावे-108, अंदाजे बाधित क्षेत्र-423.40, अंदाजे बाधित शेतकरी संख्या 1040, बाधित पिके- भात. 

    देवरी तालुका- बाधीत गावे-117, अंदाजे बाधित क्षेत्र-1936.00, अंदाजे बाधित शेतकरी संख्या 4105, बाधित पिके- भात. 

    आमगाव तालुका- बाधीत गावे-72, अंदाजे बाधित क्षेत्र-870.00, अंदाजे बाधित शेतकरी संख्या 1720, बाधित पिके- भात. 

    सालेकसा तालुका- बाधीत गावे-86, अंदाजे बाधित क्षेत्र-1200.00, अंदाजे बाधित शेतकरी संख्या 3560, बाधित पिके- भात. 

    सडक अर्जुनी तालुका- बाधीत गावे-97, अंदाजे बाधित क्षेत्र-711.00, अंदाजे बाधित शेतकरी संख्या 1869, बाधित पिके- भात. सदर पीक नुकसानीचा अहवाल नजर अंदाजित आहे.