जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather Update: राज्यात पुन्हा एकदा पावसाचा मुक्काम वाढण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

गेल्या आठवडाभरापासून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे कांदा, सोयाबीन, कापूस, मका, टोमॅटो आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. 

कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय

हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि ग्रामीण भागात शेतीसंबंधी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

उद्या या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सातारा, सातारा घाट, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    हे ही वाचा - Weather Update: राज्यात अचानक हवामान बदल! ऑक्टोबरमध्ये तापमानवाढ आणि वादळी पाऊस; शेतकरी, नागरिक हैराण