जेएनएन, गडचिरोली. Gadchiroli Encounter news: गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत झालेल्या जखमींमुळे विशेष कमांडो युनिट सी-60 चे निरीक्षक हे शहिद झाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

विशेष ऑपरेशन पथकात कार्यरत

त्यांचे नाव महेश कवडू नागुलवार (39 वर्ष) असं आहे, ते गडचिरोलीमधील रहिवासी होते आणि ते विशेष ऑपरेशन पथकात कार्यरत होते, असे पोलिसांनी सांगितले.

उपचारादरम्यान, वीरमरण

गृहमंत्री फडणवीस म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात फुलनार जंगल परिसरात माओवाद्यांचा तळ आमच्या सी-60 च्या बहाद्दर जवानांनी उदध्वस्त केला आहे. (Encounter in Gadchiroli) मात्र दुर्दैवाने या कारवाईत सी-60 पथकातील पोलिस अंमलदार महेश कवडू नागुलवार हे गोळी लागून जखमी झाले होते. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढून गडचिरोलीतील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रयत्नांची शर्थ करुनही त्यांना वीरमरण प्राप्त झाले.

नक्षलमुक्त भारताच्या अभियानात त्यांनी राष्ट्रासाठी दिलेली आहुती आम्ही कधीच विसरणार नाही आणि त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संदेशात म्हटलं आहे.

     2 कोटी रुपये अर्थसहाय्य 

    पोलिस अधीक्षकांशी मी स्वत: बोललो आहे. महाराष्ट्र पोलिस दल आणि आम्ही सारे नागुलवार यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. महेश कवडू नागुलवार यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारची मदत आणि विविध लाभांसह 2 कोटी रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल., असे मुख्यमंत्री म्हणाले.

    हेही वाचा - GBS Cases In Pune: जीबीएसने घेतला आणखी एक बळी, रुग्णांची संख्या पोहोचली 192 वर