नागपूर - महायुतीत सुरू असलेली धुसफूस अखेर संपली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नागपूरमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत महापालिका निवडणुका एकत्र लढण्यावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई, ठाणे आणि राज्यातील सर्व प्रमुख महानगरपालिका निवडणुकांसाठी महायुती एकसंधपणे मैदानात उतरणार आहे.

संघर्षाची पार्श्वभूमी

महायुतीतील काही पक्षांमध्ये जागावाटप, उमेदवारीची निवड आणि स्थानिक युती तुटण्याच्या चर्चांमुळे नाराजी वाढली होती. विशेषत मुंबई आणि ठाण्यातील जागावाटपावरून दोन्ही पक्षात मतभेद होते. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये आंतरिक स्तरावर होत असलेल्या संकेतांमुळे युतीत “फाटाफूट होणार का?” अशी चर्चा रंगली होती.

फडणवीस–शिंदे यांच्या बैठकीतील निर्णय!

बैठकीत या मुद्द्यांवर सहमती!

1. महापालिका निवडणुका एकत्र लढणार

    मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद यांसह सर्व महापालिकांमध्ये महायुती एकत्रितपणे उमेदवार उभारणार.

    2. जागावाटपासाठी समिती ,स्थानिक पातळीवरील तणाव टाळण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची संयुक्त जागावाटप समिती तयार करण्याचा निर्णय.

    3. मतभेद दूर करण्याचे निर्देश,दोन्ही पक्षांच्या जिल्हा पातळीवरील नेत्यांना “सार्वजनिक टीका थांबवण्याचे” आदेश देण्यात आले.

    4. निवडणूक रणनिती तयार,संयुक्त प्रचार मोहीम, सोशल मीडिया रणनिती आणि उमेदवार निवड प्रक्रिया यावरही सविस्तर चर्चा झाली.