जेएनएन, भंडारा. Bhandara Latest News: बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी व श्री रविशंकर यांच्या जन्मदिनी, 12 मे रोजी 'आर्ट ऑफ लिविंग' भंडारा शाखेतर्फ 'सीडबॉल महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. खामतलाव परिसरात सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या या उपक्रमात 1 लाख सिडबॉल (बीजगोल्या) वितरित करण्यात येणार आहेत.

निसर्गाच्या सहवासात मानसिक आणि शारीरिक आरोग्य टिकते

निसर्गप्रेमी शिक्षिका रजनी सोनकुसरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, माती, शेण व स्थानिक बियांपासून बनवलेल्या या शिडबॉल्सना जंगल, डोंगरदऱ्या, नदीकाठ अशा मोकळ्या जागांवर टाकले जाणार आहे. पावसामुळे या बियांना अंकुर येतो आणि कोणत्याही देखरेखीशिवाय झाडे उगवतात.  'आजचा माणूस तणावग्रस्त जीवन जगतो. निसर्गाच्या सहवासात राहिल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्य टिकते,' असे सांगून सोनकुसरे यांनी बीजसंस्काराचे महत्त्व पटवून दिले. 

उपक्रमाचा हेतू 

या उपक्रमाचा हेतू केवळ वृक्षारोपण नसून संपूर्ण पर्यावरणीय साखळी बळकट करणे आहे. झाडांमुळे वन्यप्राण्याना अन्न मिळाले तर ते गावांकडे येणार नाहीत, यामुळे शेतीचे नुकसानही टळेल.

    सिडबॉल म्हणजे काय?

    सिडबॉल म्हणजे गरजेचे खत आणि माती मिसळून केलेल्या गोटी एवढ्या गोळ्या असतात ज्यात विविध प्रकारचे बी घातलेले असते. सीड बॉल, ज्याला पृथ्वी बॉल देखील म्हणतात, माती, बियाणे, पाणी, खते आणि प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीपासून बियाणे लपवण्यासाठी आणि रोपांच्या स्थापनेला प्रोत्साहन देण्यासाठी इतर पर्यायी सामग्रीचे मिश्रण आहे.