जेएनएन, मुंबई. Maharashtra News: प्रभावी नागरी सुरक्षेसाठी उद्या राज्यात मॉक ड्रिल होणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयच्या निर्देशनुसार राज्यात  मॉक ड्रिलची जय्यत तयारी सुरू आहे. कॉलेज, विमानतळ, बस स्टेशन आणि रेल्वे स्थानक आदी ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी मॉक ड्रिल होणार आहे.

पहलगाममध्ये सामान्य नागरिकांवरील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कारवाया केल्या आहेत. भारताच्या कठोर कारवायामुळे पाकिस्तानवर अनेक निर्बंध घातले आहे. याच दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना एक मॉक ड्रिल करण्याचे निर्देश दिले आहेत. गृह मंत्रालयाने राज्यांना प्रभावी नागरी सुरक्षेसाठी उद्या रोजी मॉक ड्रिल आयोजित करण्यास सांगितले आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशनुसार, उद्या हवाई हल्ल्याच्या सायरनशी संबंधित मॉक ड्रिल करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यांना हवाई हल्ल्याच्या इशारा देणारे सायरन बसविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. हवाई हल्ल्याच्या सायरनच्या बाबतीत विद्यार्थी आणि नागरिकांना बचावकार्याचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना नागरी संरक्षण विभागाला देण्यात आले आहे. हवाई हल्ल्याच्या सायरननंतर लोक जवळच्या सुरक्षित ठिकाणी लपून राहू शकतील अशी माहिती मॉक ड्रिलमध्ये देण्यात येणार आहे.

मॉक ड्रिल काय आहे?

मॉक ड्रिलमध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांची प्रतिक्रिया कशी असेल हे बघितलं जातं. यासाठी निवडक लोकांना आणि स्वयंसेवकांना प्रशिक्षण देखील दिलं जातं. हल्ला, अपघात किंवा आग लागण्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत आपली किती तयारी आहे, हे जाणून घेण्यासाठी सामान्यतः मॉक ड्रिल आयोजित केलं जातं

    कसे होणार मॉक ड्रिल

    • हवाई हल्ल्याच्या सायरन माहिती.
    • शत्रूच्या हल्ल्याच्या बाबतीत स्वतःचे संरक्षणची माहिती देणे.
    • नागरी संरक्षणसाठी सामान्य नागरिक, विद्यार्थीना प्रशिक्षण देणे.

    हेही वाचा - Home Ministry News: गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना महत्त्वाचे निर्देश, 7 मे रोजी होणार मॉक ड्रिल