एजन्सी, छत्रपती संभाजीनगर. Marathwada News: मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि वादळामुळे वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मंगळवारी एका अधिकाऱ्याने दिली. सोमवारी बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हे मृत्यू झाल्याची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.
जालना आणि परभणी जिल्ह्यातही काही गुरे वीज पडून ठार झाल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर येथील कोडापूर येथील रहिवासी अशोक म्हस्के (22), बीडमधील मगरवाडी येथील सचिन मगर (35) आणि बीडमधील ढोरवाडी येथील अभिमन्यू नलभे (36) हे वीज कोसळून मृत्युमुखी पडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
विदर्भ आणि मराठवाड्यासह मुळसधार पावसाने काल राज्याला झोडपले. काल पडलेल्या पावसाने राज्यातील तापमानमध्ये मोठी घट झाली आहे. दरम्यान, आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली (Maharashtra heavy rains Warning) आहे. विदर्भ, मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
हेही वाचा - Maharashtra Weather Update: राज्याला अवकाळी पावसानं झोडपले; आजही सर्वदूर मुसळधार पावसाचा इशारा
गारपीठीसह वादळी पावसाची शक्यता
राज्यात आजही अनेक ठिकाणी गारपीठीसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्याचा तापमानमध्ये अंशत: घट नोंद करण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.