जेएनएन, मुंबई. Disha Salian Case Hearing: दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर आज मुंबई न्यायलयात पहिली सुनावणी होणार आहे. दिशा सालियानवर बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी याचिकेत केला आहे. सतिश सालियान यांच्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात पहिली सुनावणी होणार आहे. आमदार आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची मागणी या याचिकेत केली आहे.
आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यात यावी अशी मागणी वडील सतीश सालियन यांनी केली आहे. सतीश यांनी या प्रकरणात एक नवीन याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे, यावर आज पहिली सुनावणी होणार आहे. दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप वडिलांनी केली आहे. या प्रकरणात एनआयए चौकशी करून लवकर सुनावणी करण्याची विनंती ही सतीश सालियान यांनी कोर्टाला केली आहे. दिशा सालियान प्रकरणात मुंबई पोलिस, आदित्य ठाकरे, सूरज पांचोली यांच्यासह अनेकांवर गंभीर आरोप वडील सतीश सालियान यांनी केले आहेत.
हेही वाचा - BMC Garbage Tax: "एप्रिल फूल सरकार" म्हणत पालिकेच्या कचरा व्यवस्थापन करावर आदित्य ठाकरेंनी डागली तोफ
समीर वानखेडेंसारख्या अधिकाऱ्यांकडून तपास करण्याची मागणी
दिशा सालियान प्रकरणात अर्णब गोस्वामी, नितेश राणे यांच्या आरोपात तथ्य असल्याचे म्हटले आहे. दिशा सालियान मृत्यूचा तपास समीर वानखेडेंसारख्या अधिकाऱ्यांकडून करावा अशी मागणीची नवीन याचिकेत सतीश सालियान यांनी कोर्टात दाखल केली आहे.
पुरावे खरे मानण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप
मुंबई पोलिस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप ही सतीश यांनी केला आहे. नजरकैदेत ठेवून मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोपही याचिकेत केला आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोर्या यांच्यासह मुंबई पोलिसांवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.