जेएनएन, मुंबई. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांच्या रकमेत वाढ करून 2100 रुपये मिळणार असल्याची घोषणा महायुतीने केली होती. मात्र आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याच आश्वासन कधीच दिले नाही, असा घुमजाव केला आहे. यामुळं लाडक्या बाहीणीना 1500 रुपयावरच समाधान मानव लागणार आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे 10 मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशानात लाडक्या बहीणींना 2100 रुपये वाढवून देणार असल्याची घोषणा होण्याची शक्यता कमी आहे. 

योग्य तो निर्णय घेतला जाईल

तसंच, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुढच्या कालावधीमध्येही यशस्वीरित्या राबवण्याचे आणि चालू ठेवण्याची शासनाची भूमिका आहे. पात्र लाभार्थी महिलांवर अन्याय होऊ देणार नाही, लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना दिली.

ही घोषणा पुढील 5 वर्षासाठी

लाडक्या बहीणच्या योजनेत 2100 रुपये देण्यावरून विरोधक आक्रमक झाले आहे. महायुती सरकारने दिलेल्या जाहीरनामामध्ये लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयेवरून 2100 रुपये करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा पुढील 5 वर्षासाठी आहे, असे ही अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. 

9 लाख महिला अपात्र

    लाडकी बहीण योजनेत अनेक निकष लावून महिलांना अपात्र करण्याची मोहीम सुरूच आहे. यामध्ये पहिल्या टप्यात 4 लाख महिला लाभार्थीं अपात्र केले असून दुसऱ्या टप्यात 5 लाख लाभार्थींना अपात्र करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेत जानेवारीच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीत लाभार्थींची संख्या घटली आहे. लाडकी बहीण योजनेत डिसेंबर अखेर 2 कोटी 46 लाख महिला लाभार्थी होत्या. त्यातील 5 लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारी अखेर 2 कोटी 41 लाख लाभार्थी महिला होत्या. या योजनातून आतापर्यंत 9 लाख महिलांची नाव कमी करण्यात आले आहे. 

    लाडकी बहीण योजनेत पात्र होण्याचे निकष! (Ladki Bahin Yojana New Criteria)

    • लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करून हयातीत असल्याचा दाखलाही जोडावा लागणार आहे.
    • दरवर्षी 1जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी करणे अनिवार्य असणार आहे.
    • ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही योजनेतून बाद केले जाईल.
    • अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केले जाईल.
    • लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहे.
    • नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाही.
    • अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ मिळणार आहे.
    • अर्जातील नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यामध्ये तफावत आढळल्यास अपात्र केले जाईल.
    • नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना १५०० रुपये दिले जाणार नाही.

    अशी आहे लाभार्थीची संख्या! 

    राज्यात एकूण 83% विवाहित महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. लाडकी बहिण योजनेत सुमारे 2.5 कोटी महिला लाभार्थी आहे. त्यापैकी 83% महिला विवाहित तर 11.8% अविवाहित महिला आणि 4.7% विधवा महिला आहेत.