जेएनएन, मुंबई: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी जालना येथे घडलेल्या घटनेने महाराष्ट्र पोलिसांच्या वागणुकीवर विरोधक आक्रमक झाले आहे. एका आंदोलकाला थेट फिल्मी स्टाईलमध्ये लाथ मारल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणामुळे पोलिस दलावर टीका होत आहे.

पालकमंत्रीसमोरच लाथ मारले?
काँग्रेस आमदार विजय वड्डेटीवार यांनी आपल्या सोशल माध्यमावर या घटने पोस्ट टाकली आहे.पोलिसांकडून आंदोलकला लाथ मारल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.या प्रकरणात पोलिसकडून केलेल्या कृत्याचा निषेध केला जात आहे.घटनेनुसार, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आंदोलन सुरू असताना पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी एका पोलिसाने आंदोलकाला फिल्मी स्टाईलमध्ये लाथ मारून बाजूला ढकलले. जणू काही “सिंघम” चित्रपटातील सीन प्रत्यक्ष घडल्याचा भास झाला. या कृतीमुळे पोलिसांचा स्वभाव माजोरडा व अतिरेकी असल्याची टीका होत आहे.

लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार!
लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. आंदोलकांचे म्हणणे पटले नाही म्हणून त्यांना लाथ मारणे योग्य ठरत नाही, अशी प्रतिक्रिया अनेक सामाजिक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. पोलिस दलाचे कर्तव्य म्हणजे जनतेचं रक्षण, दडपशाही नव्हे,अशा शब्दांत या घटनेवर संताप व्यक्त होत आहे.

कारवाईची मागणी!
गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित माजोरड्या पोलिसावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी  काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केली आहे. सामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्याला पोलिस दलात जागा नाहीत अशा पोलिसाला घरी पाठवा अशी मागणी पटोले यांनी केली आहे .

हेही वाचा:Dahihandi 2025: मुंबईत दहीहंडीच्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी; अनेक भागात भिंत कोसळून दुर्घटना!