जेएनएन, मुंबई: कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवाच्या दिवशीच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला असून, रात्रीभर मुंबई शहर, उपनगर तसेच ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, वसई-विरार, वाशी आणि पनवेल परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. 

कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शहरभर भजन-कीर्तन व दहीहंडीची तयारी रंगली असतानाच पावसाने जोर पकडला आहे. अनेक ठिकाणी दहीहंडीसाठी उभारलेल्या मंडपांमध्ये पाणी साचले तर काही ठिकाणी विजेच्या खंडित पुरवठ्यामुळे कार्यक्रमात अडथळा आला.

अनेक ठिकाणी दुर्घटना !
मुसळधार पावसामुळे मुंबईत दुर्घटनेची माहिती समोर आली आहे. काही भागात झाडे पडणे, रस्त्यावर पाणी साचणे, वाहनांची वाहतूक कोंडणे अशी परिस्थिती निर्माण झाली. रात्री उशिरा उपनगरातील भागात भिंत कोसळून किरकोळ जखमींची नोंद झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र मुसळधार पावसाचा फटका दहीहंडीच्या कार्यक्रमाला बसला आहे.

प्रशासन अलर्ट!
मुंबई महापालिका व आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क असून, पावसाचा जोर वाढल्यास नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे, अनावश्यक बाहेर पडू नये, असे  सूचना दिले आहेत.रेल्वे व रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

हेही वाचा:मुंबईकरसाठी खुशखबर;मैदान, नाट्यगृह आणि  उद्यानांचे ऑनलाईन बुकिंग; मुंबई महापालिकेचं अधिकृत अ‍ॅप लवकरच नागरिकांच्या सेवेत