जेएनएन, बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायलयीन खटला आजपासून सुरू होणार असून पहिली सुनावणी होणार आहे. वाल्मीक कराडच मुख्य आरोपी असल्याचे सीआयडी तपासात निष्पन्न झाले आहे. सीआयडीने 1400 पानाचे विशेष न्यायलयात दाखल केलेल्या आरोपत्रात वाल्मिक कराड यांचे नाव मुख्य आरोपी असल्याचे तपासात स्पष्ट केले आहे.

धनजंय मुंडेंचा राजीनामा

मुख्य आरोपी वाल्मिकी कराड हा महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याने मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. आरोपी वाल्मिकी कराड याला व्हीआयपी सुविधा धनंजय मुंडे यांच्याकडून पुरवली जात असल्याचा आरोप ही विरोधी पक्षांकडून केला जात आहे.

संतोष देशमुख प्रकरणात आरोपी वाढण्याची शक्यता !

सीआयडीने केलेल्या तपासमध्ये आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून मुख्यमंत्री यांनी सकारात्मकता दाखवली असून आणखी काही आरोपीचा शोध घेऊन संख्या वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

वाल्मिकी कराड हाच मुख्य आरोपी

    सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिकी कराड हाच मुख्य आरोपी असल्याने भाजप आमदार सुरेश धस आणि अंजली दामनिया अधिकच आक्रमक झाले आहे.

    आरोपींना फाशी देण्याची मागणी

    संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी आणि निष्पक्ष तपास करण्यासाठी संतोष देशमुख कुटुंबियांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. आता न्यायालय या प्रकरणावर काय निवाळा देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    उज्वल निकम यांची नियुक्ती

    विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकम यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता ते न्यायालयात या प्रकरणाची कशी भुमिका मांडतात. याकडे देशमुख कुटुंबियासह संतोष देशमुख यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.