जेएनएन, जालना: नाफेडकडून खरेदीसाठी नियुक्त केलेली खासगी सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट प्रकरणात जय जिवाजी फार्मर प्रोड्यूसर कंपनी ढोकसाळ सेंटर तालुका मंठा सेंटरची आणि महा-किसान महासंघावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्र्यांना पत्र

नाना पटोले यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून लुटलेले पैसे परत करण्याची मागणी ही पत्रात केली आहे. नाना पटोले यांनी केंद्रीय सहकार मंत्री, नाफेड अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, पणनमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

3 आणि 10 मार्चला तक्रारदार शेतकऱ्यांची आणि जालना जिल्ह्यातील जय जिवाजी फार्मर प्रोड्यूसर कंपनी ढोकसाळ सेंटर तालुका मंठा सेंटरची चौकशी करणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. परंतु महा-किसान संघ आणि जय जिवाजी फार्मर प्रोड्यूसर कंपनीने शेतकऱ्यांना चौकशीसाठी मॅसेज किंवा नोटिस पाठवले नाही, अशी माहिती तक्रारदार शेतकऱ्यांकडून देण्यात आली आहे.

3 आणि 10 मार्चला काही शेतकरी गेले असता सेंटर बंदच होते, अशी माहिती शेतकरीकडून देण्यात आली आहे. शेतकरीची होणारी लुटमध्ये महासंघाचा वाटा असल्याचा आरोप ही शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

काय आहे प्रकरण

    महा-किसान संघाने जालना जिल्ह्यातील जय जिवाजी फार्मर प्रोड्यूसर कंपनी ढोकसाळ सेंटर तालुका मंठा यांच्या संचालिका सीमा दत्तात्रय अवचर यांना खरेदीचे सह-कंत्राट दिले आहे. जय जिवाजी फार्मर प्रोड्यूसर कंपनी ढोकसाळ केंद्रावर शेतकऱ्यांकडून गाळणी आणि हमालीच्या नावाखाली 140 रुपये प्रती क्विंटलची वसूली केली जात आहे, अशी शेतकऱ्यांनी रीतसर तक्रार जिल्हाधिकारी आणि किसान महासंघांकडे केली आहे.

    काय म्हणाले नाना पाटोले

    शेतकरीची लूट कधीही खपवून घेतली जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. आम्ही जय जिवाजी आणि महाकिसान संघावर कारवाई करून शेतकऱ्यांचे पैसे परत करे पर्यन्त थांबणार नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. 

    काय म्हणाले शेतकरी 

    जय जिवाजी फार्मर प्रोड्यूसर कंपनी ढोकसाळ केंद्रावर गाळणी आणि हमालीच्या नावाखाली 140 रुपये प्रती क्विंटलची वसूली केली आहे अशी तक्रार शेतकरी आत्माराम जाधव यांनी जिल्हाधिकारी आणि महाकिसान संघाकडे केली आहे. तक्रार करून अनेक दिवस झाले आहेत, तरीही कुठलीही कारवाई सेंटरवर केली जात नाही. आमच्याकडून घेतलेले पैसे कधी परत मिळणार याची गावातील शेतकरी वाट पाहत आहेत, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.